प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकशवाणिवरून करणार ‘मन की बात’
नवी दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा बहात्तरावा भाग आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप, तसंच आकाशवाणी, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे.
आकाशवाणीवर या कार्यक्रमाच्या हिंदी भाषेतल्या प्रसारणानंतर, लगेचच प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल. प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता होणार आहे.
