येत्या ३१ मे रोजी मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्र्यांचा देशवासीयांशी संवाद
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३१ मे रोजी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशभरातल्या लोकांशी संवाद साधतील.
हा या कार्यक्रमाचा 65 वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी लोकांनी आपल्या सुचना पाठवाव्यात असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे.
लोक आपल्या सुचना 25 मे पर्यंत पाठवू शकतात. या सुचना 1800-11-7800 या नंबरवर फोन करून किंवा नमो अॅपद्वारे नोंदवता येतील. त्याबरोबरच 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देवूनही आपण आपल्या सुचना नोंदवू शकता.
