आज देशभरात मकरसंक्रांतीचा उत्साह, सोबत पतंग महोत्सवही
मकर संक्रांतीचा सण देशभरात धार्मिक वातावरणात साजरा होत आहे. सुर्याचं उत्तरायण सुरु होत असल्यानं हा सण साजरा केला जातो. भरपूर पीक, समृद्धी आणि प्रगतीसाठी निसर्ग आणि धरणीमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
महाराष्ट्रात या दिवशी सुगड पूजनाची परंपरा आहे. एकमेकांना तिळगूळ देऊन, सद्भावना वृद्धींगत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो. काही भागात पतंग उत्सव साजरा केला जातो.
