राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फडणवीस सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याने या काळासाठीचा सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गाला खूश करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे काही घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकरांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्पामधील ठळक मुद्दे :-
१. मुंबई मेट्रोचे जाळे 11.4 किमीपासून 276 किमीपर्यंत विस्तारित झाले
२. देशातील 20 लाख 60 हजार तरुणांना नोकऱ्या
३. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी 3 हजार 498 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित
४. राज्यातील कृषिपंप जोडणीसाठी 90 कोटी तसेच एक लाख सौर पंप बसवण्याचे उद्दिष्ट
५. नाशिक, गोंदिया, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
अमरावती, जळगांव, नांदेड विमानतळ विकास मोहिमचे वेगाने काम सुरु
६. मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3 लाख 36 हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक.
७. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल 400 कोटींनी वाढवणार.
८. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 385 शहरात नागरिकांना लाभ होणार असून 2019 – 20, 6895 कोटी देणार
९. स्मार्ट सिटी अभियानात कल्याण-डोंबिवली, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक,औरंगाबाद, या 8 शहरांसाठी यंदा दोन हजार 400 कोटींची तरतूद.
१०. शेतकरी, उद्योजक, यंत्रमागधारकांना द्यावयाच्या वीजदर सवलतीसाठी यंदा 5 हजार 210 कोटींची तरतूद.
११. दुष्काळासाठी २००० कोटी आकस्मिक निधीची तरतूद
१२. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकरी आणि नंतर गरिबांचा आहे.
१३. शाश्वत शेतीसाठी उपाय योजना, गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण घटले, 151 तालुक्यात दुष्काळ, 268 महसूल मंडळात दुष्काळ घोषित केला आहे.
१४. जलसंपदा खात्यासाठी ८ हजार ७३३ कोटी रुपयांची तरतूद
१५. पाणी टंचाईवर उपाय म्हणून पाणी पुरवठ्यासाठी ५३० कोटी वितरित करण्यात आली
