गुढीपाडवानिमित्त १२ एप्रिल रोजी सोडत
मुंबई: महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मंत्रालय येथील तिकीट विक्री स्टॉलचा शुभारंभ राज्य लॉटरी आयुक्त अनिल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला.
मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात हा स्टॉल १२ एप्रिल पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सुरू राहणार आहे. १२ एप्रिल २०२२ रोजी सायं. ०४.०० वाजता सोडत असून एकूण बक्षिसांची संख्या ८६०२ आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिस रू. ५१ लाख असून, तिकीटांची किंमत रू. २०० आहे. एकूण बक्षिसांची रक्कम रू. ९८ लाख ५५ हजार आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिसाचा क्रमांक विक्री झालेल्या तिकीटांमधूनच काढण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
यावेळी अवर सचिव तथा उपसंचालक, राज्य लॉटरी, प्रशांत पाटील, सहायक राज्य लॉटरी अधिकारी सुनील लोटणकर उपस्थित होते.
