इंग्लंडमधून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन कोरोना चाचणी सुरु; नव्या कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सज्ज
या चाचणीत आतापर्यंत सापडलेल्या कोरोना बाधितांची संख्या आता २० झाली आहे.या सर्वांच्या घशातील स्रावाचे नमुने त्यांत ब्रिटनमध्ये आढळलेला विषाणूचा नवा प्रकार आहे का हे तपासण्यासाठी पुण्यातील विषाणू विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
अद्याप तिथून त्याबाबतचा अहवाल आलेला नाही.शनिवारपर्यंत राज्यात ब्रिटनमधून आलेले १७ प्रवासी कोरोना बाधित आढळले होते.काल आणखी ३ जणांना बाधा झाली असल्याचं निष्पन्न झालं.
स्कॉटलंडवरुन परतलेले बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील दोन जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.मागील दोन दिवसापूर्वी ते परदेशातून परतल्यानंतर त्यांची कोरोणा चाचणी घेण्यात आली.सध्या त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरु असुन त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
