व्यक्तिगत कर्जासह विविध ग्राहक कर्ज देतांना ग्राहकांकडून कर्ज रकमेपेक्षा २५ टक्के अधिक तारण घेण्याचे रिझर्व्ह बँकेचे निर्देश
मुंबई, दि. १७: पर्सनल लोन अर्थात व्यक्तिगत कर्जासह विविध ग्राहक कर्ज देतांना ग्राहकांकडून कर्ज रकमेपेक्षा २५ टक्के अधिक तारण घेण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना दिले आहेत. गृह, वाहन, शिक्षण आणि सोन्याच्या दागदागिन्यांवर घेतल्या जाणाऱ्या कर्जांशिवाय इतर सर्व प्रकारच्या कर्जांना हे निर्देश लागू होतील. सध्या ही मर्यादा कर्जाच्या रकमेइतकीच आहेत. बँकेने क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांसाठीही ही मर्यादा २५ टक्क्यांनी वाढवली आहे. काही व्यक्तिगत कर्जांच्या वितरणात झालेल्या वाढीबद्दल गेल्या महिन्यात पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी चिंता व्यक्त केली होती. त्या अनुषंगानं हे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
