एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड (एलटीएफएच) च्या किरकोळ कर्जवितरणाचा पोर्टफोलिओ ३० सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत ८८ टक्क्यांवर
मुंबई, दि. १४: अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) असलेल्या एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडच्या (एलटीएफएच) किरकोळ कर्जवितरणाचा (रिटेललायझेशन) पोर्टफोलिओ शेअर बाजाराला सादर केलेल्या माहितीत ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत ८८ टक्के असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत तो ५८ टक्के होता . कंपनीने आखलेल्या लक्ष्य २०२६ योजनेमध्ये ८० टक्के रिटेल कर्जवितरणाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलेले होते. त्यापेक्षा अधिक उद्दीष्ट गाठत कंपनीने कामगिरीत मोठी झेप घेतली आहे. कंपनीने ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत १३ हजार ४९० कोटी रुपयांचे किरकोळ कर्जवितरण केलेले असून वार्षिक तिमाहीच्या तुलनेत त्यात ३२ टक्के वाढ झालेली आहे.
किरकोळ कर्जवितरणाची ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ठळक माहिती पुढीलप्रमाणे आहेतः
• कृषी क्षेत्रासाठी कर्ज वितरण अंदाजे १,५३० कोटी रुपये. त्या तुलनेत एका वर्षापूर्वी याच तिमाहीत १,३०४ कोटी रुपयांची नोंद झाली होती
• ग्रामीण भागातील व्यवसायासाठी कर्ज वितरण अंदाजे ५,७४० कोटी रुपयांच्या तुलनेत एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ४,४१८ कोटी रुपयांची नोंद झाली होती
• शहरी भागातील कर्ज वितरण अंदाजे ४,८६० कोटी रुपयांच्या तुलनेत मागील वर्षी याच तिमाहीत ४,१६६ कोटी रुपयांची नोंद झाली होती
• एसएमई क्षेत्रासाठी कर्ज वितरण अंदाजे ८७० कोटी रुपयांच्या तुलनेत वर्षभरापूर्वी याच तिमाहीत २०१ कोटी रुपयांची नोंद झाली होती
३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीअखेरीस किरकोळ (रिटेल) कर्जाची एकूण रक्कम अंदाजे ६९ हजार ४०० कोटी रुपये असून वार्षिक आधारावर त्यात सुमारे ३३ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे.
