लडाखच्या गोगरा-हॉट स्प्रिंग्स भागातून भारतीय व चिनी सैन्य मागे हटण्याची प्रक्रिया सोमवारपर्यंत पूर्ण करतील
लडाख : गोगरा-हॉट स्प्रिंग्स-पी पी-15 सेना सीमारेषेवरुन माघारी घेण्यास सुरुवात केल्यानंतर भारत आणि चीननं वास्तविक नियंत्रण रेषा आणि इतर मुद्द्यांवर चर्चेला प्रारंभ केला. तसंच सीमावर्ती क्षेत्रात शांतता आणि सद्भाव कायम राखण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.
चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी म्हटलं आहे की सीमारेषेवरुन सेना माघारी घेणं हे सकारात्मक पाऊल असून परस्पर संवादाने सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यास चीन प्रतिबद्ध आहे. माओ निंग यांनी आशा व्यक्त केली की यामुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास मदत होईल. समझौत्यानुसार दोन्ही देशांकडून या क्षेत्रामधे प्रारुपबद्ध समन्वितपणे आणि प्रमाणितरीत्या सैनिकांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसंच अस्थायी आणि पायाभूत क्षेत्र तोडण्याच्या निर्णयाची दोन्ही देशांनी सहमती दाखवली आहे.
