Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून कुर्ला इमारत दुर्घटनास्थळाची पाहणी

नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून कुर्ला इमारत दुर्घटनास्थळाची पाहणी

मुंबई : कुर्ला परिसरातील नाईकनगर सोसायटीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमींची विचारपूस केली.

नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून कुर्ला इमारत दुर्घटनास्थळाची पाहणी

नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे नगरविकास मंत्री देसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. घटनास्थळाची पाहणी करत असताना दोघा जखमींना ढिगाऱ्याखालून सुखरूप वाचविण्यात आले. त्यांना तत्काळ नजिकच्या राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर देसाई यांनी राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून जखमींना सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत सूचना केल्या. अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *