केदार शिंदे, भरत जाधव, शरद पोंक्षे यांच्यासह एकूण ११ अशासकीय सदस्यांची झाली निवड
या सल्लागार समितीमध्ये डॉ. प्रकाश खांडगे, शाहीर अंबादास तावरे, केदार शिंदे, भरत जाधव, प्रशांत दामले, नंदेश उमप, शाहीर देवानंद माळी, अंकुश चौधरी, कैलास महापदी, चारुशीला साबळे-वाच्छानी, शरद पोंक्षे हे अशासकीय सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.
ही समिती सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या कार्यक्रमांचे नियोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयास सादर करेल. या समितीची बैठक दर तीन महिन्यातून एकदा होणार आहे. जन्मशताब्दी वर्ष संपुष्टात आल्यानंतर समितीचा कार्यकाळ आपोआप संपुष्टात येईल.
