Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

करोना विषाणूपासून स्वतःचे रक्षण करण्याच्या या टिप्स नक्की वाचा

करोना विषाणूपासून स्वतःचे रक्षण करण्याच्या या टिप्स नक्की वाचा

नियमितपणे हात धुवून, तसच खोकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर, अशा उपाययोजनांद्वारे कोरोना विषाणूचा यशस्वीपणे मुकाबला करता येईल असं मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलं आहे. या खबरदारीच्या उपायांचा अवलंब सगळ्यांनी, विशेष करून चीनमधून आलेल्या लोकांनी काटेकोरपणे करायला हवा, असं एम्स म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे  प्राध्यापक, डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितले.

सर्दी-खोकला झालेल्यांपासून, फुफुसाचे आणि हृदयाचे विकार असलेल्या रुग्णांनी, तसेच लहान मुलं आणि वयस्कर लोकांनी लांब रहावं अशी सूचनाही गुलेरिया यांनी केली आहे. अशा प्रकारच्या उपायांमुळे या विषाणूचा संसर्ग आणि प्रसार टळू शकेल असं ते म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *