कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित
चीनमध्ये थैमान घालणा-या आणि चीनमधून जगभरात पसरण्याचा धोका असणा-या कोरोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे.
चीनवर अविश्वास व्यक्त् करण्याचा मानस नसून परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेसे सक्षम नसलेल्या इतर देशांना मदत करण्याचा हेतू यामागे आहे,असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रस् अधनोम यांनी सांगितलं.
या विषाणूचा उद्रेक टाळण्यासाठी जलद उपाययोजना केल्याबद्दल त्यांनी चीन सरकारचं कौतुक केलं. ट्रेड्रस यांनी या आठवडयात चीनमध्ये प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि सामूहिक प्रयत्नांमधूनच कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखू शकतो, असंही ते म्हणाले.
