लोकप्रिय गायक कृष्णकुमार कुनाथ – केके यांचे निधन
लोकप्रिय गायक कृष्णकुमार कुनाथ- केके यांचं काल हृदय विकाराच्या झटक्यानं कोलकाता इथं निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते.
एक संगीत कार्यक्रम सादर केल्यानंतर त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता, त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांचे हम दिल दे चुके है सनम या चित्रपटातील तडप तडप के इस दिल से या गाण्यानं ते प्रसिध्दीच्या झोतात आले. तु जो मिला, दस बहाने करके ले गयी दिल, आँखो में तेरी अजबसी अदा है आदी गाण्यांनही त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. आतापर्यंत केके यांनी हिंदी, मराठी, तामिळ, तेलूगु, कन्नड, मल्याळम, बंगाली, आसामी, गुजराती आदी भाषेत अनेक गाणी गायली आहेत.