किरण बेदींना मद्रास न्यायालयाचा झटका
नवी दिल्ली: मद्रास उच्च न्यायालयाकडून किरण बेदी यांना जोरदार फटका बसला आहे. केंद्र सरकारकडून किरण बेदी यांना विशेष अधिकार बहाल करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांचे विशेषाधिकार काढून घेत किरण बेदी यांना पुद्दुचेरी सरकारच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करता येणार नसल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठापुढे आज किरण बेदींच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं बेदी यांचे विशेषाधिकार रद्द केले. त्यामुळं बेदी या आता सरकारची कोणतीही फाइल मागवू शकणार नाहीत. तसेच सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या कोणत्याच आदेशामध्ये त्या फेरबदल करू शकत नाहीत.
केंद्राकडून किरण बेदी यांना नायब राज्यपाल म्हणून काही विशेष अधिकार दिले होते. याच अधिकाराचा उपयोग करत त्या पद्दुचेरी सरकारच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालू लागल्या. यावरुनच मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी व किरण बेदी यांच्यातले वाद विकोपाला गेले व राजभवनसमोर नारायणस्वामी यांनी मंत्रिमंडळासह काळे कपडे परिधान करत किरण बेदींच्या काम करण्याच्या पद्धतीचा निषेध केला होता.
