आरोपींकडून खंडणी उकळण्यासाठी खोटी एफआयआर दाखल केल्याच्या प्रकरणात खालापूर न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
उरण, दि.१५(विठ्ठल ममताबादे): ऑइल टूल्स इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे Oil Tools International Services Private Ltd. तत्कालीन संचालक सुशील कुमार मेहता यांनी मे २०१९ मध्ये अजित वेणुगोपाल, साजित वेणुगोपाल, कुनिमल वेणुगोपाल आणि गोपकुमार कट्टू यांच्या विरोधात खोटी पोलिस तक्रार FIR दाखल केली होती. सुशील कुमार मेहता यांनी स्थानिक रहिवासी नीलेश वसंत पाटील यांच्या सेवांचा वापर करून खालापूर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार/एफआयआर दाखल केली.
तक्रार दिल्यानंतर सुशीलकुमार मेहता यांनी आरोपींना धमकावून बळजबरीने तडजोड करार करून आरोपींकडून त्यांच्या नावावर असलेल्या कंपनीची मालमत्ता आणि एक कोटी रुपयांचा धनादेश बळजबरीने घेतला. मात्र, साजित वेणुगोपाल यांनी कायदेशीर कारवाई करून सुशील कुमार मेहता व त्यांचे साथीदार नीलेश पाटील, राज कश्यप, पोलीस निरीक्षक जमील शेख व पोलीस हवालदार सागर शेवते यांच्याविरुद्ध मानद वाशी न्यायालयासमोर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
वाशी न्यायालयाच्या निर्देशानुसार वाशी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. चौकशीनंतर, आरोपी जमील अहमद शेख, सुशील कुमार मेहता, नीलेश वसंत पाटील, राजकुमार कश्यप, सागर शेवते आणि इतरांवर IPC च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करणारा तपास अहवाल वाशी पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी वाशी न्यायालयासमोर दाखल केला आहे.
या सर्व घडामोडी ऐकून, ऑइल टूल्स इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि गुंतवणूकदार पॉल डी. वॉटर्स यांनी कंपनीच्या खात्यांची तपासणी केली आणि आरोपींनी निधीचा कोणताही गैरवापर किंवा गुन्हेगारी कट रचला नसल्याचे आढळले. या निष्कर्षांच्या आधारे त्यांनी त्यांचे अधिकृत कायदेशीर प्रतिनिधी बजरंग गोपाळे यांना त्याबद्दल खालापूर न्यायालयाला कळवण्याचे आणि खटला मागे घेण्याचे निर्देश दिले.
दिनांक ५/१/२०२२ रोजी, माननीय खालापूर न्यायालयाने वेणुगोपाल कुटुंबातील सदस्यांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिल्याने वेणूगोपाल कुटुंबियांना आनंद झाला. अॅड. संतोष तेंडुलकर आणि अॅड. कामराज आर. दुबे यांनी खालापूर न्यायालयासमोर वेणुगोपाल कुटुंबातील सदस्यांची बाजू मांडली.
न्यायालयचा निकाल

