सतेज पाटील यांचा कर्नाटक सरकारला निर्वाणीचा इशारा
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचणी नसेल तर प्रवेश नाकारला जात आहे. कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी त्याचें राज्य सरकारनं घ्यायला हवी. अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरही बंदी घालू, असा इशारा गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. यात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत मुख्य सचिवांशी तसंच कर्नाटक सरकारशीही चर्चा केली जाईल. असं त्यांनी सांगितलं. पुणे-बंगळूर महामार्गावर कोगनोळी टोल नाका इथं कर्नाटक सरकारनं तपासणी नाका उभारला आहे. आरटीपीसीआर तपासणी झाली असेल तरच महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे. यामुळे वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं.
Source – AIR
