‘या’ राज्यात दोन आठवड्यांसाठी संपूर्ण वीकेंड कर्फ्यूची घोषणा
बेंगळुरू: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी येत्या शुक्रवारपासून दोन आठवड्यांसाठी संपूर्ण राज्यात वीकेंड कर्फ्यूची घोषणा केली आहे. हा विकेंड कर्फ्यू दररोज लागू केलेल्या रात्रीच्या कर्फ्यू व्यतिरिक्त असेल. शुक्रवारपासून रात्री १० ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कर्फ्यू असेल.
दरम्यान, पब, क्लब, रेस्टॉरंट, बार, हॉटेल, सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहे आणि सभागृह त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के सुरू राहतील. या कालावधीत मेट्रो रेल्वेसह, बेंगळुरूमधील सार्वजनिक वाहतूक कोविड नियमांचं पालन करून चालू राहतील. धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली असतील, परंतु धार्मिक कार्यक्रमांशिवाय, सर्व रॅली, धरणे, प्रदर्शन आणि निदर्शने करण्यास मनाई असेल. कर्नाटकात काल २ हजार चारशे ७९ नवीन कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद झाली. ज्यापैकी २ हजार ५३ बेंगळुरूमधील आहेत. कोविडमुळे चार रूग्ण दगावले.
