‘या’ देशांमधून कर्नाटकमध्ये येणाऱ्या प्रवाशांना आर टी पी सी आर चाचणीचा अहवाल विमानतळावर सादर करणे बंधनकारक
ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेमधून कर्नाटकमध्ये येणाऱ्या प्रवाशांना आर टी पी सी आर चाचणीचा अहवाल विमानतळावर सादर करण बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणातही राहावे लागणार आहे.
केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठीही कर्नाटक राज्य सरकारने हे नवे नियम लागू केले आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या रूपातील विषाणूचा संसर्ग भारतातल्या ४ व्यक्तींमध्ये झाल्याचे निदर्शनास आले आहे;
ब्राझीलमध्ये सापडलेल्या नव्या रूपातील विषाणूही भारतातल्या एका कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये आढळून आला आहे; तसेच केरळमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे; त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हे नियम लागू केले आहेत.
