करंजा-उरण येथील द्रोणागिरी विद्यालयाच्या १९८९ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी राबविला वृक्षारोपण उपक्रम
उरण, दि.१४: पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे, हीच काळाची गरज ओळखून द्रोणागिरी हायस्कुल करंजा एस. एस. सी. बॅच १९८९ च्या विद्यार्थी तसेच करंजा गावातील सुजाण नागरिक यांनी वृक्ष लागवड व संवर्धन हा उपक्रम राबविला, या कार्यक्रमाची मूळ संकल्पना राबविताना परेश म्हात्रे, देविदास थळी व ऍड. रमाकांत पाटील यांनी पर्यावरण विषयक आस्था आपल्या विचारातून मांडली.
असेच अनेक उपक्रम यापुढेही राबवू असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत चाणजे चे सरपंच मंगेश थळी, करंजा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गोविंद थळी, चाणजे जमीन बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश म्हात्रे, द्रोणागिरी इंग्रजी माध्यम चेअरमन गीता भगत, कामिनी, रंजना, भवानीकोळी, नरेश, गजानन, किरण कोळी, सोमनाथ, अनिल, शशांक, अमोल म्हात्रे तेलिपाडा ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष अमोल म्हात्रे, परेश म्हात्रे (MCIT ), देविदास थळी – सरचिटणीस उरण तालुका काँग्रेस कमिटी, लेखक व कवी प्रशांत पांचाळ तसेच द्रोणागिरी हायस्कूल मराठी माध्यम १९८९ बॅच चे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
