Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर येथे साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे २१ जून हा दिवस आज आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो आहे – भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर, दि. २१: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला, केंद्रीय वित्तराज्यमंत्री डॉ. भागवत कराड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली बँकिंग क्षेत्र आणि आयुर्विमा महामंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. भागवत कराड यांनी कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्वांना दैनंदिन आयुष्यातील योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच, संयुक्त राष्ट्रांनी २०१४ मध्‍ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता  दिली आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जात आहे, असे कराड यांनी सांगितले.

राज्याचे सहकार मंत्री, अतुल सावे, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, शिक्षण विभागाचे उपसंचालक अनिल साबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक महेश डांगे, एलआयसी ऑफ इंडिया चे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक संजय रामधर्णे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, मंगेश केदार यांच्यासह इतर सर्व बँक अधिकारी, योग शिक्षक, शाळा विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान “छत्रपती संभाजीनगर योग संस्थेच्या” विद्यार्थ्यांनी मेळाव्यासमोर योगासने केली. योग शिक्षक डॉ. उत्तम कळवणे, इतर शिक्षकांसह सुरेश मिरकर आणि  ताकसांडे यांनीही यावेळी योगाचे प्रात्यक्षिक केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *