Kapil Sibal
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटर हल्ला
२६ फेब्रुवारीला भारतीय वायूसेनेने पाकिस्तान मधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले केले. त्यात ठार झालेल्या दाहशतवाद्यांच्या नेमक्या आकड्यावर सुरू झालेले राजकारण आता हळू हळू जास्त तापायला लागलंय. ह्या वादात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनंतर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी उडी घेतली आहे. त्यांनी एक ट्विट करून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले आहेत. ते म्हणतात आंतरराष्ट्रीय माध्यमं ज्यात न्यूयॉर्क टाइम्स, लंडन स्थित जेन इंफॉर्मशन ग्रुप, वॉशिंग्टन पोस्ट, डेली टेलिग्राफ, द गारडीयन आणि रेउटर्स च्या मते बालाकोट येथील हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांच्या जीविताच्या नेमक्या नुकसानीचे पुरावे उपलब्ध नाहीत? तुम्ही दहशतवादावर राजकारण करण्यात दोषी आहात का?’ सिब्बल त्यांच्या ट्विट बॉम्ब ने आता वादाला एक वेगळे वळण दिले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र गुजरात दौऱ्यावर आहेत. ते ह्या साऱ्या प्रश्नांना काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Modiji :
Is international media :
1) New York Times
2) London based Jane's Information Group
3) Washinton Post
4) Daily Telegraph
5) The Guardian
6) Reutersreporting no proof of militant losses at Balakot pro-Pakistan ?
You are guilty of politicising terror ?
— Kapil Sibal (@KapilSibal) March 4, 2019
