कंगना राणावत ची बहीण रंगोली चंडेल हिचं ट्विटर अकाउंट निलंबित
मुंबई: कंगणा राणावत ची बहीण रंगोली चंडेल हिचे ट्विटर अकाउंट काही काळासाठी निलंबित(सस्पेंड) करण्यात आलं आहे. रंगोलीने दोन दिवसांपूर्वी वांद्रे स्थानकाबाहेर घडलेल्या प्रसंगानंतर काही ट्विट केले होते. यापूर्वीही तिने अनेक वादग्रस्त ट्विट करून स्वतःकडे माध्यमांचे लक्ष वेधण्याचे उद्योग केले होते. अखेर आज ट्विटर काही काळासाठी रंगोली चं अकाउंट निलंबित झालं.