Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

६२ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत कलाकृती सादर करण्याचे कला संचालकांचे आवाहन

६२ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत कलाकृती सादर करण्याचे कला संचालकांचे आवाहन

मुंबई, दि. ५ : ६२ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन  (व्यावसायिक कलाकार विभाग)  जहांगीर आर्ट गॅलरी,  मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.  या प्रदर्शात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईन कलाकृती मागविण्यात येत आहेत.

या प्रदर्शात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत.  इच्छुक कलावंतांनी दि. ७ ते २२ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत  कला संचालनालयाच्या www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन  स्वरुपात कलाकृती  सादर कराव्यात,  असे आवाहन  प्र. कला संचालक,  कला संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *