Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“गडकिल्ल्यांच्या सुशोभीकरणासाठी जेजे कला महाविद्यालयाची मदत घेण्याचा विचार” – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

जे.जे. कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव मिश्रा यांच्यासोबत झाली विविध उपक्रमांबाबत  चर्चा

मुंबई, दि. १८ : राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनात सुशोभीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा असून याबाबत जे. जे. कला महाविद्यालयाची मदत घेण्याचा शासन विचार करत असल्याचे आज सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात आज जे.जे. कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव मिश्रा यांनी मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली.

सिंहगड किल्ल्याच्या सुशोभीकरणात जे.जे. कला महाविद्यालयाचा सहभाग घेण्यावर यावेळी चर्चा झाली. तसेच कांदळवनांच्या कुंपणभींतींचे सुशोभीकरणही जे.जे. कला महाविद्यालयाने करण्याबद्दलही यावेळी चर्चा झाली. सांस्कृतिक खात्याच्या कार्यक्रमांत जे.जे. कला महाविद्यालयाचा कसा सहभाग असू शकतो यासंदर्भातही यावेळी या दोघांत चर्चा झाली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *