‘जेईई’ परीक्षेत मुंबईकर आर. के. शिशिर देशात प्रथम
मुंबई, दि. १२ : अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, जेईई अॅडव्हान्स २०२२ चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत मुंबई विभागातील आर के शिशिर यानं संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये तनिष्का काबरा हिनं अव्वल स्थान मिळवलं आहे. यावर्षी या परीक्षेत ४० हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात सहा हजार ५१६ मुली आहेत.