भारतात माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली: भारतात माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य असून त्यांना जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचा आणि त्यांना सजग करण्याचा अधिकार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलत होते.
भारतीय माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत चुकीची माहिती सांगणारे अहवाल खोटे असल्याचं लवकरच उघड होईल, असं ते म्हणाले.
Source – AIR
