Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात बनवलेल्या रॉकेटची पोखरण येथे यशस्वी चाचणी

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात बनवलेल्या रॉकेटची पोखरण येथे यशस्वी चाचणी

जळगाव: जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ इथल्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यानं बनवलेल्या पिनाका रॉकेट लाँचर पॉड MK -1 ची पोखरण येथे यशस्वी चाचणी करण्यात आली. या कारखान्यात पिनाका रॉकेट लाँचर पॉड  बनवण्याचं  काम २०१४ पासून यशस्वीपणे सुरु आहे. त्याव्यतिरिक्त या कारखान्यात उन्नत पिनाका रॉकेट पॉड विकसित करण्याचं कामही सुरू आहे. या उन्नत पिनाका रॉकेटची ४५ किलो मीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता असून, पिनाका रॉकेट MK-1 ची क्षमता ३८ किमी पर्यंत आहे.

आज करण्यात आलेली चाचणी हे भुसावळच्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्याचं मोठं यश मानलं जात आहे. या यशस्वी चाचणीबद्दल या कारखान्याचे महाव्यवस्थापक वसंत निमजे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. या कारखान्याचं गेल्या ६ महिन्यातलं हे दुसरं मोठं यश असून, डिसेंबर २०२१ मध्ये पोखरणमध्ये DPICM पॉडची यशस्वी चाचणी करण्यात आली होती.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *