Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र हुतात्मा जवान राहूल पाटील यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र हुतात्मा जवान राहूल पाटील यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

जळगाव: जळगाव जिल्ह्यातले शहीद जवान राहूल पाटील यांच्या पार्थिवावर आज एरंडोल या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी राहूल पाटील यांना मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केलं. पाटील हे सीमा सुरक्षा दलात पंजाब इथं कार्यरत होते.

पंजाब-पाकिस्तान सीमेवर कर्तव्यवार असताना शुक्रवारी ५ फेब्रुवारीला त्यांना वीरगती प्राप्त झाली. पाटील यांच्या अंत्यसंस्काराला ग्रामस्थांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *