राज्याच्या कारागृह विभागाचं कैद्यांसाठी नवीन धोरण जाहीर
मुंबई, दि. २२: राज्याच्या कारागृह विभागाने कैद्यांसाठी एक नवीन धोरण जाहीर केलं आहे. या धोरणा अंतर्गंत कारागृहात कच्चे कैदी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या महिला आणि पुरुष कैद्यांना त्यांच्या मुलांना, तसंच नातवंडं, भाऊ, बहिण भेटण्यास परवानगी मिळणार आहे.
कैद्यांबद्दल कोणताही आकस न ठेवता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपलसं करावं, त्यांना कुटुंबात सामावून घेऊन त्यांना सर्वसामान्य वागणूक मिळावी या उद्देशानं धोरण आखल्याची माहिती तुरुंग अतिरिक्त महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली. कैद्यांच्या मनात कुटुंब आणि कुटुंबातील सदस्यांविषयी आपुलकी रहावी आणि त्याचं नातं दृढ व्हावं, हा या धोरणामागचा हेतू असल्याचंही गुप्ता यांनी सांगितलं.
Source – AIR
