उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि किरण रिजीजू यांच्याशी संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून निकाली
नवी दिल्ली, दि. १५: सर्वोच्च न्यायालयाने आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजीजू यांच्या याचिकेसंबधीच्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल करुन घ्यायला नकार दिला. न्यायाधिशांच्या नेमणुकांवरुन न्यायव्यवस्था आणि न्यायाधिशांच्या नेमणुकांसाठीची न्यायवृंद व्यवस्था यावर धनखड तसंच किरण रिजिजू यांनी भाष्य केलं होतं.
मुंबई वकिल संघटनेने या दोघांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका योग्य नसल्याचे कारण देत ९ फेब्रुवारी रोजी ती फेटाळली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई वकिल संघटनेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. आज संजय किशन कौल आणि अहसदुदिन अमानुल्लाह यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी होती. खंडपीठाने ही याचिका दाखल करुन घ्यायला नकार दिला.
Source – AIR
