केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेत निर्णयावर शिक्कामोर्तब
नवी दिल्ली, दि. १७: जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने आज पेट्रोल मध्ये मिश्रण करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या इथेनॉल वरचा कर १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे दर कमी होऊन परकीय चलनाची बचत होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या ४८ व्या जीएसटी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.
जीएसटी परिषदेत सालीसह डाळींच्या भुशावरचा करही पाच टक्क्यांवरून शून्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या परिषदेत तंबाखू आणि गुटख्यावरच्या कर पद्धतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही तसेच जीएसटी लवाद नेमण्याबाबतही या बैठकीत कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. याविषयी अधिक माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
