IPO एलआयसीच्या शेअर्स ची विक्री आज आणि उद्याही सुरु राहणार
एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ गुंतवणूकदारांना खरेदीसाठी आज आणि उद्या खुला राहणार आहे. भारतीय रिझर्व बँकेने सर्व बँकांना आपले काउंटर रविवारी सुद्धा एलआयसी आयपीओ साठी खुले ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. खरेदीदारांना ९ मे पर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओचे सुरुवातीचे दर ९०२ ते ९४९ रुपये प्रति भाग असे निश्चित करण्यात आले आहेत. सरकार २२ कोटी तेरा लाखाहून अधिक समभागांच्या विक्रीतून सुमारे एकवीस हजार कोटी निधी उभारण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे.
१६ मे पर्यंत खरेदीदारांना समभाग वितरित केले जातील तर १७ मे रोजी हा आयपीओ व्यवहारासाठी खुला होईल.
