अमेरिकेच्या भारतातील राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफील्ड यांची ग्वाही
कोरोना संकटात भारताची मदत करण्यासाठी अमेरिका २४ तास काम करेल अशी घोषणा अमेरिकेच्या राजदूत, लिंडा थॉमस ग्रीनफील्ड यांनी काल केली. भारतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या कठीण काळात अमेरिका भारताच्या सोबत आहे.
भारताला कोरोना प्रतिबंधक लसींसाठी लागणारा कच्चा माल, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन पुरवठा, जलद चाचणी संच तसंच लसीकरण मोहिमेच्या विस्तारीकरणासाठी अर्थसहाय्य देण्याबरोबरच, इतर सर्व प्रकारची मदत देण्याचा संकल्प अमेरिकेने केला असल्याचं, ग्रीनफिल्ड यांनी सांगितलं.
