भारताच्या अर्थ व्यवस्थेच्या वाढीचा दर ६.९ टक्के राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज
चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थ व्यवस्थेच्या वाढीचा दर ६ पूर्णांक ९ शतांश टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेने आज व्यक्त केला. हा दर साडेसहा टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेने ऑक्टोबरमध्ये व्यक्त केला होता. त्यात आता सुधारणा केली आहे. आव्हानात्मक परिस्थितीतही भारतानं लवचिकता दाखवली होती. देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारत चांगली वाढ नोंदवेल अशी अपेक्षा आहे, असं जागतिक बँकेने म्हटलं आहे.
