भारत आणि ब्रिटनदरम्यान बंद असलेली विमानसेवा ८ जानेवारीपासून पुन्हा होणार प्रारंभ
भारत आणि ब्रिटनदरम्यानची विमानसेवा आठ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा रचना बदललेला विषाणू आढळून आल्यामुळं ही सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, आता मर्यादित स्वरूपात ही सेवा सुरू करण्यात येत असल्याचं विमानवाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितलं. २३ जानेवापर्यंत दर आठवड्याला केवळ तीस विमानांचं उड्डाण होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. मालवाहू विमानांची उड्डाणंही दर आठवड्याला पंधरापुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहेत, असं त्यांनी सांगितलं.
