Air-Marshal B S DHANOA
महत्वाचं : बालाकोट एयर स्ट्राईक वर हवाई दल प्रमुखांचं स्पष्टीकरण
२६ फेब्रुवारी रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले केले. ह्या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले? या विषयावर राजकारण तापलं असताना, हवाई दलाने कोणतंच स्पष्टीकरण दिलं नव्हतं. पण आज ह्यावर पहिल्यांदाच हवाईदल प्रमुख बी. एस. धानोआ यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. ते म्हणाले, “आमचं काम, जे टार्गेट मिळतं त्यावर हल्ला करणं हे आहे. हल्ल्यात शत्रूचं किती नुकसान झालं, किती ठार झाले, ते मोजण्याचं काम हवाई दल करत नाही. त्याची माहिती सरकारच देऊ शकतं.” ते पुढे म्हणाले जर आम्ही योग्य टार्गेट वर हल्ला केला नसता तर पाकिस्तानने प्रतिहल्ला म्हणून आपली विमानं भारताच्या हद्दीत धाडली नसती.
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्यावरील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की त्यांची तंदुरुस्तीची चाचणी चालू आहे. जर ते पूर्णपणे तंदुरुस्त असतील तर पुन्हा विमान उडवू शकतात. हवाई दल प्रमुखांच्या आजच्या पत्रकार परिषदे नंतर सत्ताधारी आणि विरोधक नेमकी काय भूमिका घेतात यावर आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
