भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वं आणि प्राधान्यक्रम हे रशियाच्या परराष्ट्र धोरणाशी मिळतीजुळती – व्लादिमीर पुतीन
भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वं आणि प्राधान्यक्रम हे रशियाच्या परराष्ट्र धोरणाशी मिळतीजुळती आहेत, असं वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलं. क्रेमलीन इथं झालेल्या कार्यक्रमात पुतीन बोलत होते. या कार्यक्रमात भारताचे रशियातले राजदूत पवन कुमार यांनी राष्ट्राध्यक्षांना अधिकारपत्रं प्रदान केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्याप्रमाणे ते दोघेही रशिया-भारत संबंध तसंच रशिया भारत धोरणात्मक भागीदारीत अधिक सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवण्यासंदर्भात नियोजन करतील, असंही पुतीन म्हणाले. ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या २१ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेस पुतीन उपस्थित राहणार आहेत.
Source-AIR
