भारताच्या फायझर कंपनीकडून ५ कोटी कोरोना प्रतिबंधक लसी इतर देशांना मोफत देणार – जो बायडन
अमेरिका भारताच्या फायझर कंपनीकडून ५ कोटी कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा विकत घेऊन त्या जगातल्या काही देशांना मोफत देणार आहे. वॉशिग्टंन पोस्ट या अमेरिकन वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन या आठवड्यात इंग्लंड मध्ये होणाऱ्या सात देशांच्या परिषदेत ही घोषणा करण्याची शक्यता आहे. असंही या वृत्तात म्हटलं आहे.
अमेरिकेसारख्या जगातल्या श्रीमंत देशांनी जगभरात कोरोना लसींच्या पुरवठ्याच्या बाबतीत पुढाकर घेतला पाहिजे या वाढत्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला. आपण लवकरचं जागतिक धोरण जाहीर करणार असल्याचंही जो बाईड यांनी या परिषदेला जाण्याआधी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. बायडन सरकारने या आधीच भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या अशियाई देशांसाठी २५ कोटी लसींच्या मात्रा पुरवल्या आहेत.
