मुंबईतील दुसर्या दिवशी झालेल्या बैठकीत सर्व पक्षांचे एकमत
मुंबई, दि. १: आगामी लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय इंडिया आघाडीतल्या पक्षांनी घेतला आहे. त्यासाठी विविध राज्यांमधे जागा वाटपाच्या हालचाली तातडीनं सुरु केल्या जातील, आणि लवकरात लवकर त्यावर निर्णय घेतला जाईल, असा ठराव मुंबईत सुरु असलेल्या या आघाडीच्या बैठकीत झाला. ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ ही संकल्पना घेऊन विविध भाषांमधे प्रचार मोहीम राबवण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.
इंडिया आघाडीची ही बैठक मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये सुरु आहे. आज बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सहभागी प्रतिनिधींच्या फोटोसेशननंतर औपचारिक बैठकीला सुरुवात झाली. आज चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल इस्रोच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. इस्रोच्या अभूतपूर्व यशानं समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यात बळकटी मिळणार आहे, तसंच युवापिढीला वैज्ञानिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे, असं या ठरावात म्हटलं आहे. संयुक्त वार्ताहर परिषदेनं बैठकीची सांगता होणार आहे.
Source – AIR
