भारताने अंतराळात ३०० किमी दूर जाऊन LEO (लो अर्थ ऑरबीट) मध्ये लाईव्ह सॅटेलाईट पाडले
नवी दिल्ली: भारताने आज अंतराळात ३०० किमी दूर जाऊन LEO (लो अर्थ ऑरबीट) मध्ये लाईव्ह सॅटेलाईट पाडले. भारताच्या अँटी सॅटेलाईट मिसाईलने अवघ्या तीन मिनिटांत लाईव्ह सॅटेलाईट पाडले आहे. हे भारताचे आतापर्यंत सर्वात मोठे यश आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील नागरिकांना दिली.
भारताने काही आज ही लक्षणीय कामगिरी केली आहे. भारताने आज अंतराळात स्वतःचे नाव कोरले आहे. डीआरडीओच्या शास्ज्ञज्ञांनी या मोहीमेत महत्त्वाची भूमिका निभावली. ‘मिशन शक्ती’मुळे भारत अधिक सुरक्षित झाला आहे. ही कामगिरी पार पाडण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आले असल्याचे मोदींनी सांगितले.
आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीनने या स्वरुपाची कामगिरी केली होती. पण आज अंतराळ क्षेत्रात भारताने आज आपला झेंडा रोवला आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी महत्त्वाचा संदेश घेऊन येत आहे, अशा आशयाचे ट्विट केले होते. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असताना मोदी नेमके काय बोलणार, याकडे देशभराचे लक्ष होते. अखेर दुपारी मोदींनी देशवासीयांना संबोधित केले. यात मोदींनी अंतराळ क्षेत्रात राबवलेल्या ऑपरेशन शक्तीविषयी माहिती दिली.
India Joins Select Group of Nations, Destroys Live Satellite in Low Earth Orbit https://t.co/zxL5jqaoxg @DRDO_India @MIB_India @PIB_India
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) March 27, 2019
