मध्यमवर्गीयांसाठी खुशखबर; इन्कम टॅक्स कररचना बदलली
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेट मध्ये प्राप्तिकरा बाबत मोठी घोषणा केली. प्राप्तिकराच्या रचनेत बदल करत अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की आता करदात्यांना ५ ते ७.५ लाख उत्पन्ना पर्यंत १० टक्के टॅक्स भरावा लागेल. त्याचवेळी ७.५ ते १० लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के टॅक्स चा भरणा करावा लागेल. तर १० ते १२.५० लाख रुपये उत्पन्नावर २० टक्के तर १२.५० लाख ते १५ लाखांपर्यंत २५ टक्के प्राप्तिकर लागू होईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं या वेळचं अर्थसंकल्पीय भाषण सर्वात जास्त वेळ चाललेलं भाषण होतं.
