IT RAID: राज्यातल्या नगर विकास बँकेच्या मुख्यालयावर आयकर विभागाचा छापा
राज्यातल्या एका नगर विकास बँकेच्या मुख्यालयावर आणि एका शाखेवर आज आयकर विभागानं छापे टाकला असून या बँकेच्या अध्यक्ष आणि एका संचालकाच्या घरावर छापा घालण्यात आली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात पॅन क्रमांक शिवाय खाती उघडून त्यामध्ये रोख रकमेचा भरणा केल्याप्रकरणी ही धाड मारण्यात आली असून ज्यांच्या नावावर हे पैसे जमा करण्यात आले त्यांनाही या बाबतची कल्पना नसल्याचं समोर आलं आहे.
अशा प्रकारची १२०० खाती उघडण्यात आली असून त्यात बँकेतल्या कर्मचाऱ्यांनीच आपले अंगठे लावल्याचंही निष्पन्न झालं आहे.
ही रक्कम मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात आली आहे. या धाडीनंतर या बँकेची अशा प्रकारच्या खात्यांतील ५३ कोटी ७२ लाख रुपये गोठवण्यात आले असल्याची माहिती आयकर विभागानं दिली असून पुढील तपास सुरु आहे.
Source – AIR
