जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याचे जागतिक नाणेनिधीचे संकेत
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची शक्यता आंतरराष्टीय नाणेनिधीनं वर्तवली आहे. काल नाणेनिधीनं या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात हे नमूद केलं आहे. गेल्यावर्षी आर्थिक वृद्धीचा दर ६ पूर्णांक १ दशांश टक्के होता. त्या तुलनेत यंदा हा दर ३ पूर्णांक ६ दशांश टक्के राहण्याचा अंदाज नाणेनिधीनं वर्तवला आहे. या आधी या वर्षीसाठी हा अंदाज ४ पूर्णांक ४ दशांश टक्के वर्तवण्यात आला होता.
या युद्धामुळे वाणिज्यीक क्षेत्रावर आणि इंधन दरांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. असंही या अहवालात म्हटलं आहे. या युद्धामुळे रशियाची अर्थव्यवस्था ८ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांनी आकुंचन पावेल. तसंच चीन, अमेरिका, युरोप मधल्या देशांची अर्थव्यवस्थाही मंदावेल, असंही हा अहवाल म्हणतो.
