Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल जाहीर, ‘या’ सहा उमेदवारांना मिळाले १०० पर्सेंटाईल

जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल जाहीर, ‘या’ सहा उमेदवारांना मिळाले १०० पर्सेंटाईल

देशभरात घेण्यात आलेल्या जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल काल जाहीर करण्यात आले असून राष्ट्रीय चाचणी यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, सहा उमेदवारांना शंभर पर्सेंटाईल मिळाले आहेत.

या विद्यार्थ्यांमध्ये दिल्लीचे प्रवर कटारिया आणि रंजीम प्रबल दास, गुजरातचा अनंत कृष्णा किदाम्बी, महाराष्ट्रातील सिद्धार्थ मुखर्जी, चंडीगढचा गुरुमित सिंग आणि राजस्थानचा साकेत झा यांचा समावेश आहे.

गेल्या महिन्यात राष्ट्रीय चाचणी यंत्रणेनं परदेशातील ९ केंद्रांसह देशातील ३३१ शहरांमध्ये आणि आठशेहून जास्त केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली होती. त्यासाठी साडेसहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती.

यंदा प्रथमच विविध १३ भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना परीक्षा देणं सुकर व्हावं आणि आपले गुण सुधारण्याची संधी मिळावी, म्हणून या वर्षीपासून ही परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *