‘आयसीआयसीआय’ बँकचे मुख्यालय गुजरात वरून महाराष्ट्रात हलवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब; महाराष्ट्राला फायदा
मुंबई: ‘आयसीआयसीआय’ बँकेने आपले मुख्यालय गुजरात वरून महाराष्ट्रात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजाराला याबाबत कळवून ‘आरबीआय’ कडून या संदर्भात नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.
बँकेने संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ‘आयसीआयसीआय’ बँक ही देशातल्या प्रमुख खाजगी बँकांपैकी एक आहे. महाराष्ट्रात बँकेचे मुख्यालय हलवण्यामागे मोठ्या प्रमाणात असलेले राज्यातील भागधारक हे कारण असल्याचे कळते. १ मे रोजी केंद्र सरकारने कडून आय.एफ.एस.सी. महाराष्ट्रातून गुजरात मध्ये हलवण्यात आलं होत आणि नेमका दहा दिवसांच्या आत उलट गुजरातहून एक मोठी बँक आपलं मुख्यालय महाराष्ट्रात हलवते यात काही राजकारण असावे का अशी शंकाही येते.
