भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावात आटोपला
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं आजपासून सुरु झालेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ३६ धावा झाल्या आहेत.
शुभमन गील २८, तर चेतेश्वर पुजारा सात धावांवर खेळत आहेत. त्याआधी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला.
मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला केवळ डाव १९५ धावांतच आटोपला.भारताच्या जसप्रित बुमराहनं ५६ धावांत ४, रविचंद्रन अश्विननं ३५ धावांत ३ तर मोहम्मद सिराजनं ४० धावांत २ गाडी बाद केले. रविंद्र जडेजाला एक बळी मिळाला.
