वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर ची आई मनोरमा खेडकरला अटक
पुणे, दि. १८: वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर हिला महाड पोलिसांनी एका हॉटेल मधून अटक केली. एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून मनोरमा फरार होत्या. अखेर रायगड पोलिसांनी तिचा माग काढला.
