दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे.
बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान, तर दहावीची परिक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.
