Mobile Surfing
मुंबईमध्ये बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढल्याने विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवार पासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मुंबईत इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याची घटना समोर आली आहे.
सांताक्रूझमधील वाकोला येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर साडेअकराच्या सुमारास पर्यवेक्षकाला तो विद्यार्थी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचे मोबाईलवर फोटो काढत असल्याचे लक्षात आले आणि हा प्रकार उघड झाला.सुदैवाने हा फोटो व्हायरल न झाल्याने पेपरफुटीचा प्रकार टळला.
या विद्यार्थ्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून बारावीची परीक्षा सुरु असल्याकारणाने त्याला अटक करण्यात आलेली नाही, त्याचा हेतू काय होता, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले.
